कुरुकली, दि. २८ फेब्रुवारी २०२६ : भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथे वाचन संस्कृतीला चालना देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण करणे या उद्देशाने शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता पुस्तक प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध विषयांवरील दर्जेदार, संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके, साहित्यिक कृती तसेच आधुनिक ज्ञानपर पुस्तकांचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी आणि स्वअध्ययनाची सवय जोपासली जावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. दिगंबर मेडशिंगे सर, अध्यक्ष, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. मोहन पाटील, उपाध्यक्ष, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ उपस्थित राहणार असून व्यवस्थापन मंडळाचे मान्यवर सदस्यही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व वाचनप्रेमींनी या पुस्तक प्रदर्शनास उपस्थित राहून ज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
— प्राचार्य
भोगावती महाविद्यालय, कुरुकली






