In the State-Level Powerlifting School Championship held in Akola on 6th and 7th February 2025, Bhogawati Mahavidyalaya’s athlete, Madhura Satappa Patil from Bachani village, represented the college in the 63 kg weight category. She lifted 220 kg and won the silver medal. Congratulations to her for this remarkable achievement, and also to the team manager and beloved sports teacher, Mr. Pawan Tipugade!
This successful journey was made possible through the collaboration between Bhogawati Mahavidyalaya, Kurukali, and Rashiwade Gram Panchayat, with the guidance of coaches Mr. Anil Divate and Mr. Dattaji Gonugade from the Balbhim Talim Mandal, Rashiwade, and the Weightlifting & Powerlifting Training Center. Congratulations to them as well for their hard work and dedication!
भोगावती महाविद्यालयाच्या मधुरा साताप्पा पाटील हिला पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक
अकोला येथे ६ व ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग शालेय स्पर्धेत भोगावती महाविद्यालयाच्या खेळाडू, बाचणी गावच्या कुमारी मधुरा साताप्पा पाटील हिने ६३ किलो वजनी गटात महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करत २२० किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे, तसेच संघ व्यवस्थापक आणि लाडके क्रीडा शिक्षक श्री. पवन टिपुगडे यांचे हार्दिक अभिनंदन!
या यशस्वी प्रवासासाठी भोगावती महाविद्यालय, कुरुकली आणि राशिवडे ग्रामपंचायत यांच्यातील सहकार्यातून बलभीम तालीम मंडळ, राशिवडे व वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक श्री. अनिल दिवते आणि श्री. दत्ता गोनुगडे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या मेहनतीला मिळालेल्या या यशाबद्दल त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!
Congratulations 🎊 👏 💐