भोगावती महाविद्यालयातील बी.एससी. भाग एक वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व उद्बोधन कार्यक्रम आज दिनांक एक ऑगस्ट 2026 रोजी संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नेताजी पाटील अध्यक्षस्थानी होते. उपस्थित विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयांमध्ये घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल तसेच परीक्षा पद्धती यांच्या बद्दल डॉ. डी .आर. चांदम यांनी मार्गदर्शन केले.
तसेच महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामध्ये समृद्ध ग्रंथसंपदा असून त्यामध्ये कथा कादंबऱ्या तसेच शैक्षणिक संदर्भ ग्रंथ व क्रमिक पुस्तके मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत .विद्यार्थ्यांनी याचा उपयोग करून विविध परीक्षेमध्ये यश संपादन करावे याबद्दलचे मार्गदर्शन ग्रंथपाल पी.एस .कल्लोळी यांनी केले.
विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने विविध योजना जाहीर केलेले आहेत याबद्दलची माहिती डॉ. टी. एम .चौगुले यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विविध खेळांमध्ये सहभागी होऊन महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असे विचार उपप्राचार्य डॉ.एस. ए .खराडे यांनी मांडले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भोगावती महाविद्यालय कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपले शैक्षणिक करिअर यशस्वी करावे. महाविद्यालय मध्ये विविध उपक्रम साजरे केले जातात यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. महाविद्यालयामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू केले जात आहे त्याचाही लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे विचार प्राचार्य डॉ.नेताजी पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उप प्राचार्य डॉ.एन. एम .पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.आर .एस .भोसले यांनी केले कार्यक्रमाचे आभार भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही.पी कोठावळे यांनी केले.
कार्यक्रमासाठी बी.एससी. भाग एकचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ.डी के दळवी,डॉ.यु .एच.पाटील, डॉ.व्ही.पी. मालेकर, डॉ. आर. एस.कांबळे, ,प्रा. व्ही .आर.पाटील, डॉ.के.एच.पठाण प्राध्यापक अमर पाटील प्रा.मुकेश पवार व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते







