भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयात मुलींच्या सोयीसाठी नूतन बस स्टॉप तसेच छत्रपती शाहू इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मुलांसाठी अत्याधुनिक क्रीडा लॅबचा (Kreedo Lab) उद्घाटन सोहळा बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. स्व. आमदार मा. पी. एन. पाटील साहेब यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने या विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्यास राजीवजी सूतगिरणीचे चेअरमन मा. राहुल पी. एन. पाटील (भैय्या) आणि जिल्हा परिषद सदस्य मा. क्रांतिसिंह संपतराव पवार-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
व्यासपीठावर गोकुळचे संचालक मा. पी. डी. धुंदरे, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव आनंदराव पाटील, व्हा. चेअरमन मा. राजाराम शंकर कवडे, संचालक मा. सदाशिवराव चरापले, मा. वसंतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा. विठ्ठल महाडेश्वर आणि करवीर पंचायत समितीच्या सभापती मा. साताप्पा धोंडीराम पाटील या प्रमुख मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नेताजी पाटील यांनी प्रास्ताविक करताना गेल्या काही वर्षांत झालेल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला आणि महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली
यावेळी बोलताना मान्यवरांनी स्पष्ट केले की, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा मिळावी म्हणून बस स्टॉपची उभारणी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक व क्रीडा कौशल्यांच्या विकासासाठी ‘क्रीडा लॅब’ची निर्मिती हे अत्यंत कौतुकास्पद पाऊल आहे.
या सोहळ्याला भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव आनंदराव पाटील, व्हा. चेअरमन मा. राजाराम शंकर कवडे, संचालक मा. सदाशिवराव चरापले, मा. वसंतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा. विठ्ठल महाडेश्वर आणि करवीर पंचायत समितीच्या सभापती मा. साताप्पा धोंडीराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, छत्रपती शाहू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि परिसरातील पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





