जयसिंगपूर : Shivaji University, Kolhapur यांच्या वतीने आयोजित १ ली आंतरराष्ट्रीय, १० वी राज्यस्तरीय व १८ वी विद्यापीठस्तरीय मानसशास्त्र परिषद Shrimati Gangabai Khivraj Ghodawat Kanya Mahavidyalaya, Jaysingpur येथे उत्साहात पार पडली. या परिषदेत भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथील मानसशास्त्र विभागातील बी.ए. भाग – II च्या विद्यार्थिनी कु. काजल दत्तात्रय बुटके व कु. रिंकू मारुती बुटके यांनी पदवीपूर्व गटात संशोधन निबंध सादरीकरण स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा गौरव केला.
त्यांच्या संशोधनाचा विषय होता – “करवीर आणि राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांमधील मानसशास्त्रीय ताण आणि मानसशास्त्रीय हित यांचा अभ्यास.” ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मानसिक ताणतणाव व मानसिक स्वास्थ्याचा अभ्यास करणारा हा विषय समाजाभिमुख व संशोधनपर दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
त्याच परिषदेत कु. वैष्णवी लोहार व कु. देवयानी बारगे यांनीही आपले संशोधन निबंध सादर करून महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व उल्लेखनीय पद्धतीने केले. तसेच इतर विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवून शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध केले.
या यशामागे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे प्रेरणादायी नेतृत्व लाभले असल्याचे नमूद करण्यात आले.
या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे व सहभागींचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.