भोगावती महाविद्यालय, कुरूकली येथील गणित विभागाच्या गुणवान विद्यार्थ्यांनी बळवंत कॉलेज येथे आयोजित “National Student Carnival” मध्ये झालेल्या Quiz Competition मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
🌟 कु. रुचा विठ्ठल पाटील (गुडाळ) — B.Sc. भाग १
🌟 कु. केदार अशोक पाटील (खि. व्हरवडे) — B.Sc. भाग २
🌟 कु. प्रतीक मारुती टिपुगडे (बेले) — B.Sc. भाग ३
या विद्यार्थ्यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतून प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा आणि परिसराचा अभिमान वाढवला आहे.
तसेच
✨ कु. नम्रता बाजीराव कोईगडे (कुरुकली) — B.Sc. भाग १
✨ कु. राज सुभाष पाटील — B.Sc. भाग ३
यांनी या गणित विषयक स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
ही स्पर्धा ,Shivaji University Mathematics Society (SUMS) व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती, तसेच नियोजन व यशस्वी आयोजन बळवंत कॉलेज, विटा यांनी केले होते.
या विजयी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. दिगंबर मेडसिंगे साहेब, व्हा. चेअरमन मा. मोहन पाटील साहेब, प्राचार्य डाॅ. डी. ए. चौगले, तसेच मार्गदर्शक प्रा. सागर पाटील, विभागप्रमुख प्रा. अमर पाटील, आणि प्रा. शामल पाटील यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.
💐 या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यास हार्दिक शुभेच्छा! 💐