तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने प्रगत होत असले, तरी माणसा-माणसांतील संवाद कमी होऊन समाजावर नकारात्मक प्रवृत्तींचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे सुसंस्कारित समाज घडविण्यासाठी विज्ञानाच्या प्रगतीला चांगल्या संस्कारांची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख यांनी केले.
कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयात आयोजित ‘पालक-विद्यार्थी संवाद कार्यशाळा’, स्व. अजित पवार जयंती व वार्षिक नियतकालिक प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नेताजी पाटील यांनी केले.
कार्यक्रमातील प्रमुख मुद्दे:
: मेन राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे आणि केआयटी कॉलेजचे प्रा. ओंकार सूर्यवंशी यांनी JEE, NEET, CET, स्पर्धा परीक्षा तसेच अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले.
नियतकालिक प्रकाशन: इंद्रजित देशमुख, राहुल पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या नियतकालिकाचे प्रकाशन पार पडले.
मनोगत: भोगावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे व उपाध्यक्ष मोहन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.उपस्थिती: कार्यक्रमास संचालक रोहित पाटील, राजेंद्र आडके, बाजीराव चौगुले, समरसिंग पवार पाटील, शिवाजीराव कारंडे, विठ्ठल महाडेश्वर, प्रा. एस. एस. आवळे, प्रा. माधव पवार, प्रा. पवन पाटील, आनंदा शिंदे, प्रा. डॉ. संजय साळोंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
आभार प्रदर्शन: उपप्राचार्या सुनीता आवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.