राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERT) यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAPF) सन २०२४–२५ अंतर्गत घेण्यात आलेल्या बाह्यमूल्यांकनामध्ये भोगावती महाविद्यालय, कुरुकली (ता. करवीर) यांना मानांकनात A+ श्रेणी प्राप्त झाली आहे.
ही श्रेणी महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, प्रभावी प्रशासन, शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थी विकास उपक्रम आणि एकूणच उत्कृष्ट कार्यपद्धती यांचे द्योतक आहे.
पंचायत समिती करवीर यांच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
ही यशस्वी कामगिरी संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या बांधिलकीची साक्ष देणारी आहे.
भोगावती महाविद्यालय परिवाराचे हार्दिक अभिनंदन!