भोगावती महाविद्यालयात भोगावती महोत्सवांतर्गत कर्मचारी–प्राध्यापक क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे भोगावती महाविद्यालय येथे भोगावती महोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयातील सीनियर–ज्युनिअर प्रशासकीय कर्मचारी, तसेच व्यवसाय अभ्यासक्रम व बी.व्होक (B.Voc.) आदी विविध विभागांतील शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे महाविद्यालयीन वातावरणात उत्साह, एकोप्याची भावना आणि क्रीडासंस्कृतीला चालना मिळाली.
या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना प्रशासकीय कर्मचारी संघ व ज्युनिअर प्राध्यापक संघ यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्यात प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सलग चौथ्या वर्षी विजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत सर्वच संघांनी खिलाडूवृत्ती जपत दर्जेदार खेळ सादर केला.
या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे केले होते. स्पर्धेची वेळ, सामने, साखळी स्वरूप, तसेच चार दिवस चाललेल्या सामन्यांचे नियोजन शिस्तबद्ध व पद्धतशीर रीतीने करण्यात आले होते. कोणताही वाद, अडचण किंवा गोंधळ न होता स्पर्धा यशस्वीपणे पार पडली, याचे सर्व श्रेय प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजन व संघटन कौशल्याला जाते.
स्पर्धेसाठी आवश्यक क्रिकेट साहित्य जसे की बॉल, स्टंप, अंपायर, स्कोरर, स्पीकर्स, तसेच क्रीडांगणाची स्वच्छता आदी सर्व बाबींची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक सामन्यापूर्वी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक (टॉस) करून सामने वेळेत सुरू होतील, याचीही विशेष काळजी घेण्यात आली. तसेच मॅनेजमेंट व सिनियर प्राध्यापक यांच्यात सामना आयोजित करून एक अनोखा उपक्रमही राबविण्यात आला.
या यशस्वी आयोजनामध्ये उत्तम पाटील, अजित कांबळे, भरत डोंगळे, संदीप पवार, गुजले तसेच कार्यालयीन व इतर विभागांतील सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सर्व स्टाफसाठी उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. गरमागरम भात, आमटी आणि शिरा अशी उत्कृष्ट मेजवानी देण्यात आली असून, जेवणाच्या नियोजनातही कुठेही कमतरता जाणवली नाही.
ही स्पर्धा आणि त्याचे नियोजन अनेक वर्षे स्मरणात राहील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ, भोगावती महाविद्यालयातील सीनियर स्टाफ, ज्युनिअर स्टाफ, व्यवसाय अभ्यासक्रम व विद्यार्थी यांच्या वतीने या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल नॉन-टीचिंग (प्रशासकीय) कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार
🙏🙏🙏🙏