भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथे राष्ट्रीय विज्ञान दिन अत्यंत उत्साहात साजरा केला गेला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले, डॉ. एस. एन. साळोखे यांच्या हस्ते डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक भोगावती महाविद्यालय सायन्स क्लब चे प्रमुख डॉ. डी. आर. चांदम यांनी केले. उपप्राचार्य डॉ. डी. एल. कांबळे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व विषद केले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयामार्फत आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्यांच्या हस्ते व सायन्स क्विझ स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. एन. एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास 50 विद्यार्थ्यांनी आयुर्वेद आणि शास्त्र, स्त्रियांचे विज्ञानातील योगदान, प्लास्टिक मुक्त भारत, एआय: फायदेे आणि तोटे या विषयावर प्रेझेंटेशन सादर केले तर 95 विद्यार्थ्यांनी क्विझ मध्ये सहभाग नोंदविला. तसेच शास्त्र शाखेकडील सर्व विभागांनी भरवलेल्या सायन्स एक्झिबिशनला उत्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रम व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सायन्स क्लब कमिटी सदस्य, शास्त्र शाखेकडील सर्व विभागाचे प्राध्यापक, ग्रंथपाल पी. एस. कल्लोळी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.