कुरुकली, [२८ जुलै २०२५] – भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोगावती महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार , दिनांक २६ जुलै २०२५ रोजी ‘कारगिल विजय दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ११:०० वाजता ग्रंथालय सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. पवन पाटील यांच्या स्वागत आणि प्रास्ताविकाने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे सभापती, मा. श्री. दिगंबर मा. मेडसिंगे यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून वीरपत्नी श्रीमती हेमलता संग्राम पाटील (निगवे खा.), निवृत्त सुभेदार श्री. संजय माने (गणेशवाडी), माजी सैनिक श्री. दत्तात्रय खंडेराव पाटील (हळदी), निवृत्त सुभेदार श्री. सचिन मारूती पाटील (कुई) आणि निवृत्त नायक श्री. अण्णासाहेब ब. कुंभार (हसूर) उपस्थित होते.
यावेळी श्री अण्णासाहेब कुंभार (नि. नायक), वीरपत्नी श्रीमती हेमलता संग्राम पाटील, श्री दत्तात्रय खंडेराव पाटील (मा. सैनिक), श्री सचिन मारूती पाटील (नि. सुभेदार) आणि श्री संजय माने (नि. सुभेदार) यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी पी कांबळे आणि प्रा. सौ. ऋतिका गोनुगडे यांनी केले. सौ. उज्वला कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री शिवाजीराव भाट (संचालक), श्री बाजीराव चौगले, श्री समरसिंह पवार पाटील, प्राचार्य डॉ डी ए चौगले , उपप्राचार्य डॉ डी एल कांबळे , पर्यवेक्षिका सौ. आवळे मॅडम , N.S.S. प्रकल्प अधिकारी प्रा. एस वाय पाटील व डॉ ए पी कांबळे, N.C.C. कॅप्टन प्रा. आर जी पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ संजय साळोखे, प्रा मानसिंग पाटील, प्रा. संदीप चौगले, प्रा. टी एस पाटील तसेच बी एससी ची विद्यार्थिनी किर्ती आंबेकर, अभिजीत मेटिल आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल युद्धातील शूरवीरांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘हिमालय से उँचा साहस उनका, सर जो किसी के आगे ना झुका, मातृभूमि की खातिर किया सब अर्पण, ऐसे विरों को मेरा नमन’ या उक्तीप्रमाणे, मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांना आदरांजली वाहण्यात आली.




















