महाविद्यालय, कुरुकली येथील भूगोल विभागाच्या वतीने ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लोकसंख्याविषयक ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत ४७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
लोकसंख्या दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लोकसंख्याविषयक ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत ४७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांना जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व, लोकसंख्या वाढ, आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण, कुटुंब नियोजन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रश्नमंजुषेद्वारे विद्यार्थ्यांच्या लोकसंख्याविषयक ज्ञानाची चाचणी घेण्यात आली तसेच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. नेताजी महादेव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन भूगोल विभाग प्रमुख डॉ. संजय नारायण साळोखे, डॉ. नवनाथ केदारी बनसोडे आणि प्रा. अमर तुकाराम गायकवाड यांनी केले.