भोगावती महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून २१ जून २०२६ (रविवार) रोजी विशेष योगविषयक पुस्तक प्रदर्शनाचे (Book Exhibition on Yoga) यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एम. पाटील यांच्या हस्ते आणि उपप्राचार्य डॉ. एन. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. सुनील खराडे व सौ. आवळे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या नाविन्यपूर्ण प्रदर्शनामध्ये ग्रंथालयातील योगशास्त्र, प्राणायाम, ध्यानधारणा, निसर्गोपचार, सुदृढ आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य या विषयांवरील अत्यंत दुर्मिळ, माहितीपूर्ण व मार्गदर्शक ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले होते. महर्षी पतंजली यांच्या योगसूत्रांपासून ते आधुनिक काळातील आरोग्य व्यवस्थापनावर आधारित विविध लेखकांची पुस्तके यामध्ये वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. एन. एम. पाटील यांनी ग्रंथालय विभागाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. केवळ शारीरिक योगासने करण्यासोबतच योगशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि त्यामागील विज्ञान समजून घेण्यासाठी अशा पुस्तकांचे वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे ग्रंथपाल, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.