भोगावती महाविद्यालयात २१ जून २०२६, रविवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून एकदिवसीय योग साधना व प्रात्यक्षिके कार्यशाळेचे (Yoga Workshop) आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचा क्रीडा विभाग (Sports Department) आणि शारीरिक शिक्षण विभाग (Department of Physical Education) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक व योगतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध योगगुरू प्रतीक पाटील उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्वांना योगाचे महत्त्व सांगून विविध योगासनांची शास्त्रोक्त प्रात्यक्षिके (Yoga Practicals) करून घेतली. दैनंदिन जीवनात योगासने आणि प्राणायाम करताना कोणती काळजी घ्यावी, श्वासाचे नियंत्रण कसे ठेवावे आणि क्रीडा क्षेत्रात तसेच मानवी जीवनात शारीरिक-मानसिक संतुलनासाठी योग कसा उपयुक्त ठरतो, याचे उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी या कार्यशाळेत केले.
ग्रंथालयात योगविषयक पुस्तकांचे प्रदर्शन: या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने योग साधनेवर आधारित विशेष पुस्तक प्रदर्शनाचे (Book Exhibition on Yoga) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये योगशास्त्र, प्राणायाम, ध्यानधारणा, सुदृढ आरोग्य आणि मानसिक शांतता या विषयांवरील दुर्मिळ व मार्गदर्शक पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. या प्रदर्शनाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट देऊन ग्रंथांचे वाचन केले.





























कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एम. पाटील हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्यांनी कार्यशाळेच्या आणि पुस्तक प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल सर्व संबंधित विभागांचे कौतुक केले. ते म्हणाले, “योगा ही केवळ एक दिवसाची कृती नसून ती जीवनशैली आहे. दोन्ही विभागांच्या वतीने आयोजित या संयुक्त कार्यशाळेचा आणि ग्रंथालयातील पुस्तक प्रदर्शनाचा फायदा सर्वांना आपले आरोग्य व विचार सुदृढ ठेवण्यासाठी नक्कीच होईल.”
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. एन. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. सुनील खराडे आणि सौ. आवळे मॅडम प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होत्या.
या कार्यशाळेमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी रविवारची सुट्टी असूनही अत्यंत उत्साहाने या योग प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला. क्रीडा, शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत नेटके व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.