भोगवती महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष व भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा. दिगंबर मारुतराव मेडसिंगे आणि प्रमुख वक्ते डॉ. सुरेश चव्हाण (इतिहास विभागप्रमुख, ओंकार महाविद्यालय, गडहिंग्लज) यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नेताजी पाटील, संस्थेचे व्हा. चेअरमन मा. मोहन पाटील, सेक्रेटरी श्री. अक्षय जाधव, उपप्राचार्य डॉ. एन. एम. पाटील, उपप्राचार्या सौ. आवळे मॅडम, डॉ. सुनील खराडे आणि ग्रंथालय कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाशया प्रदर्शनामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तके, त्यांचे सामाजिक कार्य, महाराष्ट्राचा इतिहास, दुर्मिळ ग्रंथांचे संकलन मांडण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी ग्रंथालय विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
हे ग्रंथप्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. ग्रंथालय विभागाच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.