कुरुकली (करवीर): येथील भोगवती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने बुधवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमप्रसंगी लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दिगंबर मारुतराव मेडसिंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतीकारी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक धोरणांचा गौरव केला, तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची पार्श्वभूमी मांडली.त्यानंतर, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. सुरेश चव्हाण यांचा विस्तृत परिचय डॉ. एम. बी. थोरात यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ओंकार महाविद्यालय, गडहिंग्लज येथील इतिहास विभागप्रमुख डॉ. सुरेश चव्हाण उपस्थित होते. त्यांनी शाहू महाराजांच्या समतावादी विचारांवर आणि त्यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
अध्यक्षीय मनोगतात बोलताना मा. दिगंबर मारुतराओ मेडसिंगे यांनी, “प्रत्येक विद्यार्थ्याने आणि नागरिकाने शाहू महाराजांचे विचार केवळ ऐकून न थांबता, ते विचार आत्मसात करून जीवनात पुढे जावे,” असा महत्त्वपूर्ण संदेश दिला. तसेच हा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी संस्था व महाविद्यालय नेहमीच कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नेताजी पाटील, भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाचे व्हा. चेअरमन मा. मोहन पाटील, सेक्रेटरी श्री. अक्षय जाधव, उपप्राचार्या सौ. आवळे मॅडम, डॉ एन एम पाटीलआणि संस्थेचे माजी संचालक प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व मान्यवरांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सूत्रसंचालन आणि निरोप (आभार)
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. डी. पी. कांबळे आणि सौ. रुतिका गोणुगडे यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप आणि उपस्थितांचे आभार (निरोप) उपप्राचार्या सौ. आवळे मॅडम यांनी मानले.









