कुरुकली, दि. 23 जून : भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथे जागतिक ऑलिंपिक दिनाचे औचित्य साधून शारीरिक शिक्षण विभागामार्फत आकर्षक फलक लेखन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.क्रीडा भावनेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या प्रसंगी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख. डॉ.सुनील खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना जागतिक ऑलिंपिक दिनाचे महत्त्व, क्रीडा संस्कृतीचे जतन, नियमित व्यायामाचे फायदे तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंमध्येही जागतिक दर्जाचे खेळाडू बनण्याची क्षमता असून, योग्य मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.