कुरुकली, दि. ११ जुलै : भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथील भूगोल विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त माहितीपर भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य प्रो. डॉ. नेताजी महादेव पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. नवनाथ केदारी बनसोडे यांनी प्रास्ताविक करून जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व, लोकसंख्या वाढीची आव्हाने, संसाधनांचे नियोजन आणि शाश्वत विकासामध्ये जनजागृतीची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. उद्घाटनप्रसंगी प्राचार्य प्रो. डॉ. नेताजी महादेव पाटील यांनी विद्यार्थ्यांनी लोकसंख्येशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करून समाजामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास माजी प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. डी. ए. चौगले, भूगोल विभाग प्रमुख डॉ. संजय नारायण साळोखे, प्रबंधक श्री. अजित कांबळे, प्रा. पवन पाटील तसेच भूगोल विभागातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अमर तुकाराम गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी भूगोल विभागाचे कौतुक केले.




