भोगावती महाविद्यालय कुरूकली येथे अण्णा भाऊराव साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी भोगावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नेताजी पाटील मराठी विभाग प्रमुख डॉ. सविता अशोक व्हटकर प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ नेताजी पाटील व मराठी विभाग प्रमुख यांंनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊराव साठे यांच्या विषयी विचार मांडले. ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ‘अशी ग्वाही देणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे. तर ‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर उभा राहिलेली नसून, ती दलितांनी आपल्या हातावर पेललेली आहे. असे क्रांतीकारक विचार अण्णा भाऊराव साठे यांनी आपले साहित्य लेेखन करताना जोपासले व तशाच पद्धतीचे साहित्य त्यांनी लिहिलेले आहे. तळागाळातील समाजाला जागृत करण्याचे कार्य त्यांनी आपल्या अक्षररूपी साहित्यातून कथा, कादंबरी, वगनाट्य ,नाटक, प्रवासवर्णन,समीक्षा, गाणी, कवने, पटकथा लेखन तसेच वैचारिक साहित्याच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुखदा -हाटवळ यांनी केले. आभार प्रा. सुनीता आवळे यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. नमिता पाटील यांनी केले.

