दिनांक 07/06/2024 रोजी पार पडलेल्या कोल्हापूर जिल्हा 19 वर्षाखालील रग्बी निवड चाचणी मध्ये जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला असून भोगावती महाविद्यालय कुरुकली येथे हा निवड चाचणी सोहळा पार पडला
भोगावती महाविद्यालय कुरुकली आणि कोल्हापूर जिल्हा रग्बी असोसिएशन यांच्यामध्ये असलेल्या सामंजस्य करारामधून हा उपक्रम राबवण्यात आला व यामध्ये आलेल्या खेळाडूंपैकी 20 खेळाडूंची निवड झाली पैकी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बारा खेळाडूंची यादी निश्चित होईल.
खेळाडूंची निवड करण्यासाठी कोल्हापूर रग्बी सचिव तथा अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री दीपक प्रकाश पाटील, प्रा राहुल लहाने, आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी कल्याणी पाटील कुमारी शुभांगी गावडे, कुमारी पूजा कुंभार, ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू कुमार श्रीधर पाटील, प्रा संग्राम मोरे हे उपस्थित होते.
निवड झालेल्या खेळाडूंपैकी न्यू कॉलेज प्रशिक्षण केंद्र पाडळी बालिंगे प्रशिक्षण केंद्र, भोगावती महाविद्यालय प्रशिक्षण केंद्र आणि कोपर्डे प्रशिक्षण केंद्र येथील खेळाडूंनी भाग घेऊन चमकदार क्रीडा प्रदर्शन केले.








