Bhogawati Mahavidyalaya’s Former Student Kiran Patil Appointed as Mumbai Police Constable
Date: 27 Feb 2025- Mr. Kiran Vishwas Patil, a former student of Bhogawati Mahavidyalaya from Kurdu village, has recently been appointed as a Mumbai Police Constable. In recognition of his remarkable achievement, he was felicitated by Vice Principal Dr. D. L. Kamble at the college.
Kiran Patil completed his B.Sc. in Chemistry from Bhogawati Mahavidyalaya in 2023-24. Through his dedication and perseverance, he successfully cleared the police recruitment process, bringing pride to both his college and his village.
On this occasion, the faculty and students of the college congratulated him and extended their best wishes for his future endeavors.
कोल्हापूर, दिनांक: भोगावती महाविद्यालयाचे कुर्डू गावातील माजी विद्यार्थी श्री. किरण विश्वास पाटील यांची मुंबई पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयात उपप्राचार्य डॉ. डी. एल. कांबळे सर यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
किरण पाटील यांनी २०२३-२४ मध्ये भोगावती महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयात बी.एस्सी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीने त्यांनी पोलीस भरतीत यश संपादन करून महाविद्यालयाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.