Remarkable Achievements of Former Students of Bhogawati College
The former students of Bhogawati College are achieving great success in their respective fields. Shri Shritej Jalandhar Bhat (B.Sc. Chemistry, Batch 2020-21) has recently been appointed as a Mumbai Police Constable. Similarly, Shri Pawan Satappa Chougale (B.Sc. Chemistry, Batch 2020-21) has secured a position as a Research Assistant in a reputed chemical manufacturing company. Additionally, Shri Mangesh Prakash Dhere (B.Sc. Chemistry, Batch 2023-24) has been appointed as a Distillery Operator.
To honor their achievements, a felicitation ceremony was organized by the college. The students were presented with books by Vice-Principal Dr. N. M. Patil and NAAC Coordinator Dr. D. K. Dalvi. Career Katta Committee Coordinator Shri Ranjit Sadanand Bhosale appreciated their accomplishments and extended his best wishes.
On behalf of the college principal and faculty, heartfelt congratulations and best wishes to these talented former students for their bright future!
Bhogawati College, Kurukali
Date:
भोगावती महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आपल्या क्षेत्रात यशस्वीपणे कामगिरी करत आहेत. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. श्रीतेज जालंधर भाट (बी.एस्सी. रसायनशास्त्र, सन २०२०-२१) यांची नुकतीच मुंबई पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. तसेच, श्री. पवन साताप्पा चौगले (बी.एस्सी. रसायनशास्त्र, सन २०२०-२१) यांची एका नामांकित रसायन उत्पादन कंपनीत संशोधन सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली आहे. श्री. मंगेश प्रकाश ढेरे (बी.एस्सी. रसायनशास्त्र, सन २०२३-२४) यांची डिस्टिलरी ऑपरेटर म्हणून निवड झाली आहे.
या तिघांचा महाविद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य डॉ. एन. एम. पाटील आणि नॅक समन्वयक डॉ. डी. के. दळवी यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. करिअर कट्टा कमिटीचे समन्वयक श्री. रणजीत सदानंद भोसले यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य व संपूर्ण शिक्षकवृंदाच्या वतीने या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
भोगावती महाविद्यालय, कुरुकली
दि. १ मार्च २०२५