कुरुकली दि. ३ : किर्लोस्कर ऑईल इंजिन प्रा. लि., लक्ष्मी फौंडेशन गर्जन व वनस्पतीशास्त्र विभाग, भोगावती महाविद्यालय कुरुकली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन्यजीव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.. यावेळी पर्यावरणतज्ञ श्री. सुहास वायंगणकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, “केवळ १९ इंचाचा घेर असलेला वृक्ष एका वर्षात साडे तेहतीस लाख रुपये किंमतीचा ऑक्सिजन निर्माण करतो. त्यामुळे वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर प्रत्येक वन्यजीव प्रजातीचे संवर्धन करणे ही सगळ्यात महत्त्वाची मानवी जबाबदारी आहे.. भोगावती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एन. एम. पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते..आर. एस. भोसले यांनी प्रास्ताविक केले. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. उदयसिंग पाटील यांनी आभार मानले.
या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला..






