भोगावती महाविद्यालय , कुरुकली येथे कवी कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांची 114 वी जयंती मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा . डॉ . सविता व्हटकर यांनी केले . प्रमुख पाहुणे मा . प्रा .एस . एस . घाटगे यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितेचा ओघवता परामर्श घेतला . प्रा . पवन पाटील यांनी मराठी भाषेचे महत्व यावर आपले विचार व्यक्त केले . उपप्राचार्य डॉ .डी . एल. कांबळे यांनी मराठी भाषेची जपणूक यावर भाष्य केले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . डी . ए . चौगले यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमांसाठी प्रा . सुखदा ऱ्हाटवळ तसेच सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय कर्मचारी , विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार प्रा . विश्वास पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा . नमिता पाटील यांनी केले .