भोगावती महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे माजी ग्रंथपाल मा. श्री. माधव कुलकर्णी यांचा त्यांनी केलेल्या उल्लेखनीय ग्रंथालयीन सेवेबद्दल दिनांक ७ मार्च रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सत्कार करून कार्याचा गौरव करण्यात आला. हा सन्मान महाराष्ट्र ग्रंथपाल संघटनेमार्फत प्रदान करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ ग्रंथालय व MUCLA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने हा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील ग्रंथपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. श्री. माधव कुलकर्णी यांनी सन १९७६ मध्ये भोगावती महाविद्यालय ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून रुजू होऊन तब्बल ३० वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यांनी दिनांक ३१ एप्रिल २००६ रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. आपल्या सेवाकाळात ते शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर ग्रंथपाल प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत होते. तसेच त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयावर तीन पुस्तके लिहून शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांचे कार्य व योगदान ग्रंथालय क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या सत्कारामुळे भोगावती महाविद्यालयासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.