कुरूकली, १० जानेवारी २०२५ – भोगावती महाविद्यालय, कुरूकली आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या IQAC विभागाच्या संयुक्त विद्यमाने “पॅरिस-स्पर्श योजना” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन यशस्वीपणे पार पडले. ही कार्यशाळा १० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता भोगावती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे प्रास्ताविक IQAC, भोगावती महाविद्यालय, कुरूकली चे समन्वयक डॉ. डी. के. दलवी यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या महत्त्वावर प्रकाश टाकत उपस्थितांना पॅरिस-स्पर्श योजनेबद्दल सखोल माहिती व उद्देश यांची माहिती दिली. कार्यशाळेचे प्रमुख संसाधन व्यक्ती, माननीय प्रा. डॉ. एस. डी. डेळेकर, IQAC संचालक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी या योजनेच्या उद्दिष्टे, फायदे आणि अंमलबजावणीच्या प्रक्रियेवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. डी. ए. चौगले, भोगावती महाविद्यालय, कुरूकली यांनी महाविद्यालयाच्या विकासाबाबत प्रकाश टाकला
डॉ. एन. एम. पाटील, उपप्राचार्य, भोगावती महाविद्यालय, कुरूकली यांनी कार्यशाळेच्या समारोपापूर्वी उपस्थिती दर्शवली. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन *डॉ. चांदम * यांनी केले.
या कार्यशाळेचा उद्देश पॅरिस-स्पर्श योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षक याना मार्गदर्शन करणे होता. कार्यशाळेत विविध महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा, उत्साही सहभाग होता. यामुळे पॅरिस-स्पर्श योजनेची अंमलबजावणी अधिक सशक्त आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे.
कार्यशाळेचे आयोजन IQAC, भोगावती महाविद्यालय, कुरूकली आणि IQAC, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.


















