भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथील शारीरिक शिक्षण विभागाच्या बी.ए भाग तीन मधील विद्यार्थ्यांची पोलीस व सैन्य भरतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गायत्री शहाजी डोंगळे, अनुष्का सर्जेराव मोरे, समीक्षा पांडुरंग डोंगळे आणि स्नेहा मनोहर डोंगळे. प्रतीक महादेव पाटील यांची महाराष्ट्र पोलीस दलात, तर प्रज्वल तानाजी पाटील याची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शारीरिक शिक्षण विभागाच्या नियमित प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे हे यश मिळाले आहे.या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.नेताजी k,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख.डॉ.सुनील खराडे,सहाय्यक प्रा.अक्षय चव्हाण व अजय खराडे यांचे सहकार्य लाभले.