कुरुकली (ता.29) भोगावती महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विभागातील सर्व प्राध्यापकांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नेताजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य नेताजी पाटील म्हणाले जीवनाला दिशा देण्यासाठी मानवाच्या जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रथम गुरू असणाऱ्या आई-वडिलांना विसरू नये. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन बी ए भाग 3 मधील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.समृद्धी पाटील हिने केले.
कार्यक्रमास भूगोल विभाग प्रमुख डॉ.संजय साळोखे. डॉ. नवनाथ बनसोडे. प्रा. अमर गायकवाड. श्री संभाजी पाटील. भूगोल विषयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सानिका राबाडे हिने मानले.







