कुरुकली, १५ ऑगस्ट २०२५ – भोगावती महाविद्यालय, कुरुकली येथे आज ७९ वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी अचूक 8.30 वाजता ध्वजवंदन व ध्वजपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वजपूजन मा. श्री. राजू आडके, संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीताच्या गजरात तिरंगा फडकताच परिसर देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भो. शि. प्र. मंडळाचे चेअरमन मा. श्री. दिगंबर मेडसिंगे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाची आठवण करून दिली आणि आजच्या पिढीने शिक्षण, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने देशसेवा करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भोगावती साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन ता. श्री. एम. आर. पाटील आणि उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी ग्रामीण भागातील युवकांनी तंत्रज्ञान, शेती आणि उद्योजकता यामध्ये पुढाकार घेऊन आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे सांगितले.
यावेळी भो. शि. प्र. मंडळाचे व्हाईस चेअरमन मा. श्री. मोहन पाटील, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले, उपप्राचार्य डॉ. सुनील खराडे, उपप्राचार्य डॉ. एन. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. एल. कांबळे, रजिस्ट्रार श्री. अजित कांबळे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. एस. एन. साळोखे, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध उपक्रम व प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. इतिहास विभागाने “जागतिक वारसा यादीत समाविष्ट कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले” या विषयावर पोस्टर सादरीकरण केले. तसेच “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण” या विषयावर आकर्षक रांगोळी तयार करण्यात आली. रांगोळी साकारण्यात संदीप निकम, मनसिंग पाटील, संदीप चौगले, दिगंबर सुतार, रुतिका गोनुगडे, स्वाती पाटील, उज्ज्वला कांबळे, वैशाली पाटील, दिपाली जाधव, नमिता पाटील, शोभा पाटील मॅडम, अवळे मॅडम, तेजस्वी भुईंगडे यांचा सक्रिय सहभाग होता.
रेखाटण्यात आली. बारावी कला शाखेचा विद्यार्थी सोहम सचिन साठे याने संसदेचे मॉडेल सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. या सर्व प्रदर्शनांचे उद्घाटन चेअरमन मा. श्री. दिगंबर मेडसिंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात तृतीय वर्ष बी.ए. ची विद्यार्थिनी किरण अंबेकर हिने देशभक्तीपर गीत सादर केले.
महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटने भव्य परेड सादर केली, ज्याचे समन्वयन कॅप्टन प्रा. आर. जी. पाटील यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पवन पाटील यांनी कौशल्यपूर्णपणे केले. आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. डी. एल. कांबळे यांनी केले.
या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा, राष्ट्रीय एकतेची जाणीव तसेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांची आवड वृद्धिंगत झाली.




