कुरुंदवाड येथे भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग लिग 2025-26 स्पर्धेत भोगावती महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी केली आहे.
- कु. निकिता शिंदे (बलभीम तालीम, राशिवडे बु.) — 86 कि. गटात सुवर्ण पदक 🥇
- कु. प्रणिती चव्हाण — 77 कि. गटात रौप्य पदक 🥈
- कु. मधुरा पाटील — 63 कि. गटात कांस्य पदक 🥉
- कु. अक्षता गोनुगडे — 48 कि. गटात बेस्ट ऑफ सिक्स
या खेळाडूंना प्रशिक्षक व राज्य पंच श्री. दत्तात्रय गोनुगडे आणि श्री. अनिल दिवसे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा देत पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
🔥✨💐 हार्दिक अभिनंदन! 💐✨✌️


