कुरकली (ता. करवीर) : भोगावती महाविद्यालय, कुरकली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात योग प्रशिक्षक श्री. मुकुंद सुतार यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. राहुल लहाने (जिमखाना चेअरमन) यांनी केले. प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. डी. ए. चौगुले, उपप्राचार्य डॉ. एन. एम. पाटील, प्रा. डॉ. सुनील खराडे, डॉ. डी. एल. कांबळे, डॉ. एस. एन. साळोखे, डॉ. एस. वाय. पाटील, डॉ. ए. पी. कांबळे, प्रा. आर. जी. पाटील, डॉ. पी. एस. कल्लोळी, डॉ. डी. टी. दळवी आणि डॉ. विजय कोठावळे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. राहुल लहाने यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुनील खराडे यांनी केले. प्राचार्य डॉ. चौगुले यांनी योग दिनाचे महत्त्व विशद केले.
संस्थेचे चेअरमन मा. श्री. दिगंबर भाऊ मेडसिंग, व्हाइस चेअरमन मा. श्री. मोहन पाटील व संचालक मंडळाने योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व छत्रपती शाहू इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







