भोगावती महाविद्यालय, कुरूकली येथे दिनांक 26 जून २०२५ रोजी* *राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अत्यंत उत्साह, अभिमान आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक समतेचे प्रणेते, शिक्षणप्रेमी आणि बहुजन समाजासाठी झटणारे पुरोगामी राजे म्हणून ओळख असलेल्या शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रम राबवण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. श्री. दिगंबर मेडशिंगे साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. विठ्ठल महाडेश्वर यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. प्रमुख वक्ते प्रा. राजेश पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यावर सखोल भाष्य करत विद्यार्थ्यांना शाहू महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मा. श्री. मोहन पाटील (उपाध्यक्ष, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ) आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एस. एन. साळुखे, उपप्राचार्य डॉ. डी. एल. कांबळे, डॉ. एन. एम. पाटील यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. नंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आणि शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित गीत सादर केले.
📚 ग्रंथालय विभागात विशेष ग्रंथ प्रदर्शन
ग्रंथालय विभागात राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके, चरित्रे, संशोधनपर ग्रंथ आणि छायाचित्रांचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापक वर्गाचा उदंड प्रतिसाद लाभला.

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.
हा कार्यक्रम सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने घेणात आला.






























